Posts

ऑफिस - भाग २ : तेलुगु देसम

या भागाला दिलेले नाव वाचून "तेलुगु देसम" राजकीय पक्षाशी येथे काही संबंध आहे काय असा तुम्हाला एक सहज प्रश्न पडला असेल तर मी तुमची ती शंका संपूर्णपणे चुकीची आहे असे म्हणणार नाही. फक्त एक सुधारणा - लेख राजकीय पक्षाशी संबंधित नसून ऑफिसमधील संपूर्ण तेलुगु देशबांधवांची प्रशंसा आणि उदोउदो आहे.

तुम्हाला आतापर्यंत कळले असेलंच की मी ज्या ऑफिसमध्ये जातो (कशासाठी जातो, काय करतो, किती वेळ करतो हा वेगळा विषय आहे - तो आपण पुन्हा कधीतरी उगाळून काढू!) ते ऑफिस अमेरिकेतील एका बर्‍यापैकी चालणार्‍या कंपनीचं माहितीतंत्रज्ञान विभागाचं ऑफिस आहे. अमेरिकेला अर्थार्जनाकरिता आलेल्या अनेक भारतीय देशबांधवांपैकी बरेच लोकं इथे काम करतात. फक्त ह्या काम करणार्‍यांपैकी एका भल्या मोठया समूहाचे अर्थार्जनाव्यतिरिक्त 'स्थलांतरण' हा एक गुपित उद्देश्य असतो. असो बापडा! ज्याला जिथे आवडेल त्याने तिथे राहावे; मरेस्तोवर राहावे. यांत भारतातील प्रत्येक प्रांतातील प्रतिनिधी तर आहेतच, पण कुठल्या प्रांतातील प्रतिनिधींचे प्रमाण किती आहे यामध्ये मात्र बरीच तफावत आहे. आमच्या ऑफिसमध्ये काम करणार्‍या भारतीयांपैकी फार तर वी…

ऑफिस - भाग १ : अमेरिकन बायका

आजकाल मला ऑफिसला जायची भीती वाटते. म्हणजे एकदमच घाबरलेलो आहे वगैरे प्रकार नाही; फक्त त्या ठिकाणी जायला जरा मनाची तयारी करावी लागते इतकंच.
का विचाराल तर तशी कारणे पण बरीच आहेत. सगळ्यात मोठे आणि मुख्य कारण म्हणजे काही अमेरिकन बायका. या बायकांनी माझी झोप उडविली आहे. गैरसमज करून घेऊ नका; मी ऑफिसमध्ये जाऊन झोपतो अशातला भाग नाही; किंवा, या बायकांसोबत माझी प्रेम प्रकरणे सुरु आहेत असलंसुद्धा काही नाही. या बायकांची कार्यालयीन कक्षे (क्युबिकल) माझ्या कक्षाला लागून आहेत. ह्या कक्षांच्या भिंती ह्या फार तर सहा फुटाच्या उंचीच्या आहेत आणि छत मात्र दहा फूट वर आहे. त्यामुळे ह्या बायका जो काही गोंधळ घालतात तो त्या कक्षेमधून या कक्षेमध्ये सर्रास येण्याला कसलीही आडकाठी नाही. सर्वप्रथम माझ्याच कक्षाला लागून असलेल्या पलीकडच्या ओळीमधील कक्षेतल्या बाईची गोष्ट. एक मध्यमवयीन, जरूरीपेक्षा जास्त अंगकाठी, घटस्फोट झालेला आणि एका म्हाताऱ्या आईला व किशोरवयीन मुलीला सांभाळण्याची जबाबदारी असलेली ही बाई. पहिल्या दोन गोष्टी सोडून बाकीच्या दोन गोष्टी मला कशाकाय माहित झाल्या असाव्यात याचा अंदाज तुम्हाला समोरच्या लिखाणात …

सावजी

Image
सावजी म्हणजे नेमके कोण हा प्रश्न सोडवणे तसे किचकटच आहे. जसे आपले आचारी, सुतार, कुंभार, तसे सावजी हे पण कुठल्या जमातीचे नांव आहे काय असे मला उगाच वाटत असावे. "सावजी" हे एक आदरपूर्वक संबोधन म्हणून सुद्धा वापरल्या जाते; पुष्कळदा कवितेत. म्हणजे "या सावजी - घ्या सावजी, कसं काय रावजी" - वगैरे यमक साधण्याचा प्रकार साधायला कवई मोकळे. पण आमचा सावजी ह्या शब्दाशी संबंध मात्र "सावजी कोंबडी" ह्याच वाक्यातील प्रयोगाशी येतो. तुम्ही शाकाहारी असाल तर पुढचा संपूर्ण लेख हा अगदी जहाल मांसाहाराशी संबंधित आहे याची जाणीव असू द्यावी. मांसाहार हा आपला आवडीचा विषय नसेल तर समोरचे शब्द पालथी घालण्यापूर्वी जरा विचार करावा. नंतर म्हणू नका की सांगितले नाही म्हणून!

तर, कोणी सावजी म्हटले रे म्हटले की आमच्यासमोर झणझणीत अस्सल रश्याची देशी (जिला गावराणी पण म्हणतात) कोंबडीची तिखट भाजीच येते. मोठ्या प्रेमाने आम्ही त्या भाजीला "सावजी चिकन" म्हणतो. आणि त्यांत तर खास कांडूण आणलेल्या लाल मिरचीच्या तिखटाचा आणि घरीच वाटून बनवलेल्या अस्सल मसाल्याचा सुळसुळाट झाल्याशिवाय तर काही मजाच येत नाही…

अशी वादळे येती

नुकतेच "अशी वादळे येती" लेखाक्रमाचा शेवटचा भाग संपवला. ही नोंद या लेखमालिकेतील सगळे भाग खाली दिल्याप्रमाणे एकत्रित करण्यासाठी!

अशी वादळे येती

अशी वादळे येती - भाग १: शब्दांची चकमक
अशी वादळे येती - भाग २: निसर्गाचे समीकरण
अशी वादळे येती - भाग ३: अडचणीत अडचण
अशी वादळे येती - भाग ४: माझं घर शेणाचं

अशी वादळे येती - भाग ४: माझं घर शेणाचं

दरवर्षीचा "हरिकेन सीझन" सुरु झाला की आग्नेयी राज्यांत आणि त्यातल्या त्यात फ्लोरिडा राज्यात मोठे वादळ धुमाकूळ घालणार हे शंभर टक्के ठरलेलेच असते. फ्लोरिडा हे निवृत्तीचे ठिकाण मानल्या जाते - म्हणजे अख्खे आयुष्य कर्म करून एकत्र केलेला पैसा घेऊन निवृत्त झालेले अमेरिकन पिकली पानं इथे मस्तपैकी घरं करून राहतात. महावादळाच्या जीवघेण्या रस्त्यामध्ये राहणारी ही "सीनियर" जनता "देवा, संपूर्ण आयुष्य झटून गोळा केलेल्या संपत्तीनेसुद्धा आता मनाला शांती मिळत नाही. तेव्हा लवकरात लवकर कुठले तरी 'हरिकेन (महावादळ)' पाठवून मला घेऊन जा रे बाबा!" म्हणत जीवावर उदार झालेली असावी अशी मला शंका येते. नाहीतर एवढी संपत्ती असल्यानंतर एखाद्या शांत ठिकाणी "रिटायर" होण्यापेक्षा जेथे निसर्गाने रणधुमाळी माजवली आहे असल्या मढ्यात राहण्याच्या भानगडीत का बरे पडावे?

या सगळ्यात एक गोष्ट नोंद घेण्यासारखी आहे. ती म्हणजे या वादळांना दिलेली नावं. जागतिक हवामान संस्थेची चौथी प्रादेशिक 'हरिकेन कमिटी' अमेरिकेच्या आजूबाजूला निर्माण होणार्‍या वादळांना नावे देण्याचे काम करते. ज्याही व…

अशी वादळे येती - भाग ३: अडचणीत अडचण

Image
अमेरिकेच्या हवामान खात्याचं काम अगदी चोख असतं. वादळ वारा यांना दुरूनच दिसत असतो. जर कुठले वादळ किंवा झंझावात येणार असे ह्या हवामान खात्याने सांगितले की ती दगडावरची रेघ होऊन जाते. तसेच सर्वसाधारणतः ज्यादिवशी पाऊस पडणार असे सांगितले की नव्वद प्रतिशत पाऊस पडणारंच. जेव्हा लख्ख ऊन सांगतात तेव्हा सूर्यही तळपत राहणार. किंबहुना अमेरिकन पाऊस, वारा या गोष्टी अमेरिकन हवामान खात्याला विचारूनच पुढचे कार्य आखत असावेत.

आपल्याकडील वार्‍याचं आपण काही तरी बिघडवलेलं असणार. नाहीतर आपल्या देशीय शासनाच्या हवामान खात्याला हवा कुठल्या दिशेने वाहते याची खरोखरच हवा असती. मराठी बातम्यांमध्ये "आज लख्ख ऊन पडणार" अशी बातमी आली की आमचे देशी शेजारी नेमके त्याच दिवशी छत्री काढत. एकदा "उद्या भरपूर पाऊस" म्हणून दूरदर्शनच्या बातम्यांवरून कळलं. आमच्या शेजार्‍यांनी दुसर्‍या दिवशी छत्री नेलीच नाही. योगायोगाने त्यादिवशी मुसळधार पाऊस पडून शेजारी ओलेचिंब भिजले आणि पुढे आजारी पडले. नंतर बरे झाल्यावर हवामान खात्याच्या कार्यालयात जाऊन त्यांनी "काय लेकहो बेभरवशाचे तुम्ही!" म्हणून जो पहिला सापडला त्याच…

अशी वादळे येती - भाग २: निसर्गाचे समीकरण

Image
मुसळधार पाऊस - त्यामुळे आलेला पूर, किंवा पाऊस न आल्यामुळे दुष्काळ, भूकंप असल्या अबला नैसर्गिक आपत्त्या आपल्याला महाराष्ट्रात अधुनमधुन खाजवून जातात म्हणून ओळखीच्या आहेत. "टोर्नाडो (प्रचंड महाभयंकर चक्रीवादळ)" आणि अमेरिकेतले "लेवल फाईव हरिकेन (म्हणजे आपल्यासोबत भेटीला दीडशे मैलांच्या अंदाधुंद वेगाने वाहणारी वादळे, धूमाधार पाऊस, सेक्युरिटी गार्ड सारखे नेहेमीच सोबतीला ठेवलेले अनेक टोर्नाडो आणि जातानाची आठवण म्हणून अब्जावधी किमतीच्या नुकसानास कारणीभूत असणारे महापूर असल्या गोष्टी घेऊन येणारे महाप्रचंड झंझावात)" ह्या अमेरिकेसारख्या बलाढ्य (म्हणजे "बला" आणि "आढ्यता" ज्याच्यामध्ये कुटूनकुटून भरली आहे असा जो तो) देशाला लोटांगण घालायला लावणार्‍या गोष्टी आम्हा मराठीभूमीतील बांधवांच्या एवढ्या जंगी परिचयाच्या नाहीत. तसा परिचय वाढविण्याचे कारणही उद्भवत नाही ही एक चांगली गोष्ट आहे. म्हणूनच मराठी माणसाकडे एक चिंतेचं कारण कमी असतं.

भूकंप ह्या प्रकाराला मराठी माणूस घाबरत नाही. संपूर्ण जग भूकंपाच्या भितीने आपल्या इमारती भूकंपापासून सुरक्षित करण्याच्या मागे पडले असते…