Posts

Showing posts from August, 2005

मी रंगलेला

'सोनेरी केसांनी मढलेली, पिवळी मादक साडी घातलेली, डोक्यात सुंदर पिवळा गुलाब खोचलेला आणि गोरा रंग तिच्या त्या पिंगट अभिव्यक्तीला फिक्का पाडेल अशी काया असणारी अतिशय उन्मादक सौंदर्या ती नुकतीच धबधब्यातनं केसं पुसत बाहेर आली. भान हरपून तिच्याकडे बघत असतानाच मी हात पुढे केला आणि तिला मी उभा असलेल्या प्रचंड शिळेवर येण्यास मदत केली. लगेच कुठूनतरी कुजबुजल्या आवाजात हलकेच आकाशवाणी झाली "...तूर साबुन आपके गोरे रंग को निखारे..". ते सौंदर्य पाहून देव सुद्धा बरळायला लागला होता.


अगदी सुंदर पाण्याचा डोह, कडेला तो अतिउंच धबधबा, सभोवताली सुंदर वनराई, मध्ये गोलाकार मऊ शिळाखंडांच्या माळा आणि निरभ्र आकाश असल्या देखव्यातून मी तिचा हात हातात धरून पळत चाललो होतो. तिथे समोरच हिरवागार गालिचा पसरल्यासारखा सुंदर बगीचा होता. तिथे आम्ही धाप लागून बसतो नं बसतो तेवढ्यात तिच्या डोळ्यात पाहाता पाहाता मी मुग्ध होऊन गेलो.

"छलके तेरी आंखोंसे शराऽब औऽर जियादा" हे गीत माझ्या प्राणवायूत शिरल्यासारखे बाहेर पडू लागले. कधी हातात हात घालून तर कधी एकमेकांमागे असे आम्ही बागेत विहरू लागलो. भ्रमंती करता करता …

नावात काय आहे?

नावात काय आहे?

बर्‍याच वर्षांपूर्वी जो कोणी (नक्की कोण हा प्रश्न गौण आहे) हे वाक्य म्हणून गेला, तो म्हणून गेला खरा, पण सगळ्या जगताला एक वादाचा विषय देऊन गेला. मी पुष्कळ वेळा "नावात काय आहे" ह्यावरचा वाद टाळत असतो. कारण "नावात काही नाही" आणि "नावातच सगळे काही आहे" अशा दोन्ही बाजूंनी पटवून देणारे पुष्कळ महाशय असतात.आमेरिकेत आल्यानंतरच कळले कि यांपैकी कुठ्लीही बाजू घेण्याकरता अनुभव असावा लागतो. कुठलीही बाजू का होईना, ती पटायला स्वतःच्या नावाचा कुणीतरी खेळ केलेला असायला लागतो. तोच खेळ किती तरी वेळा चाललेला असतो या देशात!

माझ नाव पवन. अख्ख्या मराठीत सगळ्यात सोपी अशी "पवन, मदन, नयन" ह्यांच्याशी यमक जुळणारी आणि काना मात्रा नसणारी दुसरी नावे नाहीत. पण अमेरिकन माणसे म्हणा किंवा बाया म्हणा, एक दोन वगळले तर एवढे सोपे नाव बरोबर बोलवून दाखवेल असा एकही जण सापडणार नाही.

ह्या प्रकरणाची सुरवात एका होटेल मॅनेजर पासून झाली. इथे लोकांची नावे "Rachel" ला "रेचल", "Aaron" ला "एरन", "Cary" ला "केरी" अशी उच्चारली …