आजकाल मला ऑफिसला जायची भीती वाटते. म्हणजे एकदमच घाबरलेलो आहे वगैरे प्रकार नाही; फक्त त्या ठिकाणी जायला जरा मनाची तयारी करावी लागते इतकंच. का विचाराल तर तशी कारणे पण बरीच आहेत. सगळ्यात मोठे आणि मुख्य कारण म्हणजे काही अमेरिकन बायका. या बायकांनी माझी झोप उडविली आहे. गैरसमज करून घेऊ नका; मी ऑफिसमध्ये जाऊन झोपतो अशातला भाग नाही; किंवा, या बायकांसोबत माझी प्रेम प्रकरणे सुरु आहेत असलंसुद्धा काही नाही. या बायकांची कार्यालयीन कक्षे (क्युबिकल) माझ्या कक्षाला लागून आहेत. ह्या कक्षांच्या भिंती ह्या फार तर सहा फुटाच्या उंचीच्या आहेत आणि छत मात्र दहा फूट वर आहे. त्यामुळे ह्या बायका जो काही गोंधळ घालतात तो त्या कक्षेमधून या कक्षेमध्ये सर्रास येण्याला कसलीही आडकाठी नाही. सर्वप्रथम माझ्याच कक्षाला लागून असलेल्या पलीकडच्या ओळीमधील कक्षेतल्या बाईची गोष्ट. एक मध्यमवयीन, जरूरीपेक्षा जास्त अंगकाठी, घटस्फोट झालेला आणि एका म्हाताऱ्या आईला व किशोरवयीन मुलीला सांभाळण्याची जबाबदारी असलेली ही बाई. पहिल्या दोन गोष्टी सोडून बाकीच्या दोन गोष्टी मला कशाकाय माहित झाल्या असाव्यात याचा अंदाज तुम्हाला समोरच्या ...
Comments