मोलकरीण
आम्ही अमेरिकेला आल्यापासून आमच्या लहान अपार्टमेंट किंवा टाऊनहाऊस मध्ये राहत असता कधी मोलकरीण बोलवायची गरज पडली नव्हती. आमच्या छोट्याश्या टुमदार घरात स्वच्छता ठेवण्यासाठी मला आणि माझ्या पत्नीला काही जड जात नव्हते. दोघेच असल्यावर हे सगळं आटोक्यातलंच. पण आम्हाला जेंव्हा पहिली मुलगी झाली त्यानंतर जागा अपुरी पुरते म्हणून आम्ही मोठं बेसमेंटचं घर घेतलं आणि आता मुलांमुळे स्वच्छता हा सहज सुलभणारा प्रश्न उरला नाही. एका मध्यमवर्गीय अमेरिकन घरास पुणेकर किंवा मुंबईकरांसारखी पूर्णवेळ मोलकरीण ठेवणे हे काही परवडणारे नसते. वरनं माझ्या एका पुण्यात राहणाऱ्या मित्राच्या घरी घडलेली मोलकरणीची व्यथा मी काही विसरलो नव्हतो: माझ्या मित्राच्या पूर्ण कुटुंबाला लगबगीत एका आठवड्याकरिता शहराबाहेर जावे लागले आणि परत आल्यावर मोलकरणीने त्यांना त्यावेळचा पूर्ण पगार मागितला कारण "शहराबाहेर ते सगळे गेले होते मोलकरणीला न सांगता, मोलकरीण थोडेच त्यांना न सांगता गेली होती - तिने तर न चुकता रोज त्या दिवसांत घराची खेप टाकली होती ना!" असो. (समोर काय झाले हा आपला विषय नाही!) देशातल्या मोलकरणींच्या इतर कथा सां