ऑफिस - भाग २ : तेलुगु देसम
या भागाला दिलेले नाव वाचून "तेलुगु देसम" राजकीय पक्षाशी येथे काही संबंध आहे काय असा तुम्हाला एक सहज प्रश्न पडला असेल तर मी तुमची ती शंका संपूर्णपणे चुकीची आहे असे म्हणणार नाही. फक्त एक सुधारणा - लेख राजकीय पक्षाशी संबंधित नसून ऑफिसमधील संपूर्ण तेलुगु देशबांधवांची प्रशंसा आणि उदोउदो आहे. तुम्हाला आतापर्यंत कळले असेलंच की मी ज्या ऑफिसमध्ये जातो (कशासाठी जातो, काय करतो, किती वेळ करतो हा वेगळा विषय आहे - तो आपण पुन्हा कधीतरी उगाळून काढू!) ते ऑफिस अमेरिकेतील एका बर्यापैकी चालणार्या कंपनीचं माहितीतंत्रज्ञान विभागाचं ऑफिस आहे. अमेरिकेला अर्थार्जनाकरिता आलेल्या अनेक भारतीय देशबांधवांपैकी बरेच लोकं इथे काम करतात. फक्त ह्या काम करणार्यांपैकी एका भल्या मोठया समूहाचे अर्थार्जनाव्यतिरिक्त 'स्थलांतरण' हा एक गुपित उद्देश्य असतो. असो बापडा! ज्याला जिथे आवडेल त्याने तिथे राहावे; मरेस्तोवर राहावे. यांत भारतातील प्रत्येक प्रांतातील प्रतिनिधी तर आहेतच, पण कुठल्या प्रांतातील प्रतिनिधींचे प्रमाण किती आहे यामध्ये मात्र बरीच तफावत आहे. आमच्या ऑफिसमध्ये काम करणार्या भारतीयांपैकी फार तर वी...