काही गोष्टी, काही गमती ........

Saturday, August 06, 2005

देवनागरी लिहिण्याकरीता

तसं पाहता मराठीत लिहिण्यास मदत करणारी बरीच सॉफ्टवेअरं आहेत, पण एकही मला वेगाने मराठी लिहू देईना. म्हणून मीच एक सॉफ्ट्वेअर बनविले आहे आणि त्याचा वापर येथे मराठीतून लिहिण्याकरता केला आहे. आपल्या मराठी बांधवांच्या मुक्त वैयक्तिक उपयोगाकरता (free personal use) मी हा "मराठी फोनेटिक टाईपसेटर" (Marathi Phonetic Typesetter) प्रोग्राम माझ्या साईट (http://www.pkls.com/marphon.php) वरती उपलब्ध केला आहे. कृपया ह्या प्रोग्रामाचा वापर करून तुम्हाला काय वाटते ते जरूर कळवावे. प्रोग्रामातील उणीवासुध्दा जरूर कळवाव्यात.

(09/07/2005 Update) - नुकतेच "Baraha Direct" सॉफ्टवेअर वापरणे सुरू केले. एक "f11" बटन दाबले की जे लिहाल ते सरळ मराठी "युनिकोड" मध्ये बदलून येते. त्यामुळे देवनागरीत वेबसाईट वर लिहिणे सोपे झाले आहे. फक्त "Baraha Direct" वापरताना कीबोर्ड वर लिहिलेले इंग्रजी "मराठी युनिकोड" मध्ये बदलण्यासाठी योग्य "settings" वापारावे.

5 Comments:

At Wednesday, August 10, 2005 10:45:00 AM, Anonymous Nikhil (Ann Arbor, MI) said...

nice blog... will try your s/w...

 
At Sunday, August 14, 2005 11:41:00 PM, Blogger Pawan said...

इथे बघितल्याबद्दल धन्यवाद. माझ्या प्रोग्रामाबद्दल तुम्हाला काय वाटते ते जरूर कळवा.

 
At Tuesday, September 20, 2005 7:34:00 AM, Anonymous Deepak Patil said...

mi khaali majkur copy paste kelaa.. paN malaa ithe ase maraathitun direct type karataa yeil kaa???

tumhi kase karataa??

***copy paste kelelaa majkur***
aadhi ekhaade tool vaaparun type karaayache aani mag ithe paste karaayache kaa???

dhanyavaad.
Deepak
deepakpat@yahoo.com

नुकतेच "अशी वादळे येती" लेखाक्रमाचा शेवटचा भाग संपवला. ही नोंद या लेखमालिकेतील सगळे भाग खाली दिल्याप्रमाणे एकत्रित करण्यासाठी!

 
At Tuesday, September 20, 2005 7:49:00 AM, Blogger Pawan said...

मी सध्या www.baraha.com वरील "Baraha Direct" हे सॉफ्टवेअर वापरतो. त्यामुळे सरळ मराठीत लिहिता येते आणि "Copy-Paste" ची गरज पडत नाही. मी माझ्या एका ब्लॉगवर देवनागरी "Copy-Paste" न करता सरळ कशी लिहावी या बद्दल थोडी माहिती येथे दिली आहे.

मी पुढे मागे माझ्या "Marathi Phonetic Typesetter" वर पण काम करेल. पण जोपर्यंत ते वापरास साधे (म्हणजे "Copy-Paste" न वापरता सरळ मराठीतूनच लिहिणे) बनत नाही तोपर्यंत "Baraha Direct" हे एक छान सॉफ्टवेअर आहे.

 
At Thursday, April 27, 2006 8:50:00 AM, Anonymous रोहित पेंडसे rovipen@gmail.com said...

मराठी लिप्यन्तरक (transliterator) फारच छान आहे. मी स्वतः याचा खूप वापर करतो. धन्यवाद.

मला असंही वाटतं की तांत्रिक इंग्रजी शब्दांना सोपे मराठी प्रतिशब्द वापरून आपण मराठी अधिकाधिक प्रगत बनवू शकू. मला असं वाटतं की आपण आपल्या ब्लॉगमधे programसाठी प्रणाली असा प्रतिशब्द वापरल्यास ते अधिक चांगलं वाटेल.

रोहित.

 

Post a Comment

<< Home